योगासनांमुळे शरीर निकोप राहते, तसेच मानसिक संतुलन आणि मनाची एकाग्रता राखण्यासही त्यांची मदत होते. योगासनांना लहानपणापासूनच सुरुवात करणे म्हणजे ओल्या मातीला योग्य वेळी योग्य आकार देणे म्हणूनच या पुस्तकात मुलांचा विचार करून योगासनांच्या काही कृती छायाचित्रांसह दिल्या आहेत. सुस्पष्ट छायाचित्रांमुळे योगासने त्यातील बारकाव्यांसह करण्यास मदत होईल. तसेच योगासनांचे महत्त्व, हठयोग म्हणजे काय, ध्यानसाधना कशी करावी यासंबंधी प्राथमिक माहितीही यात आहे. या पुस्तकामुळे नियमित योगासने करणे हा मुलांना कटकटीचा पिरियड न ठरता खेळाचा तास ठरू शकतो!