व. ग. देवकुळेप्रस्तुत ग्रंथाचे लेखक कै. व. ग. देवकुळे यांनी १९२४ पासून व्यायामाची आवड ठेवून १९२७ ते १९३२ क्रिकेटच्या खेळात प्रावीण्य मिळविले. पुण्याच्या महाराष्ट्रीय मंडळ व्यायामशाळेत १९२८ ते १९३६ पर्यंत सर्व प्रकारचे व्यायाम केले. व्यायाम शिक्षकाचेही काम केले. मंडळाचे आजीव सदस्य होते.फर्ग्युसन कॉलेजमध्ये आंतरमहाविद्यालयीन सामन्यासाठी तीन वर्षे व यू. टी. सी. त तीन वर्षे कुस्ती चैंपियन होते. १९३१ ते १९३६ पर्यंत कुस्ती, नमस्कार, मल्लखांब, वनसंचार, चालणे, रस्सीखेच आदी व्यायामात नैपुण्य मिळवून पुढे १९४२ पर्यंत सर्व व्यायाम चालू ठेवले. १९३५ पासून त्यांनी आसनांचा अभ्यास सुरु केला. त्याचे अनेक वर्ग त्यांनी चालविले. रेडिओवर अनेक वेळा भाषणे दिली. योगासनासंबंधी यशस्वी संशोधन व प्रयोग चालू केले.उत्कर्ष प्रकाशनउत्कर्ष प्रकाशन, पुणे ४११००४ दूरध्वनी : २५५३७९५८, २५५३२४७९