योगाचार्य बी.के.एस.अय्यंगार यांनी योगसाधना व योगासने यांचा जास्तीत जास्त प्रसार करण्याचं जणू व्रतच अंगिकारलं आहे. ‘योग सर्वांसाठी’ हे पुस्तक याचाच एक भाग आहे. शरीराच्या विशिष्ट तक्रारींसाठी उपयुक्त पडणारी योगासने विभागवार देऊन या पुस्तकाची रचना वापरायला सोपी अशी वेगळया पध्दतीने करण्यात आली आहे. मानसिक आरोग्य व योगसाधनेच्या इतर बाबींचाही या पुस्तकात विचार करण्यात आला आहे. पुस्तकाचं आणखी एक वैशिष्टय म्हणजे सर्वांनाच योगासनं करणं शक्य व्हावं यासाठी उपकरणांची वा इतर वस्तूंची मदत कशी घ्यावी, यावर पुस्तकात दिलेला भर! या पुस्तकाचा लाभ व्याधिग्रस्त किंवा धडधाकट – स्त्री, पुरुष, मुले सर्वांनाच होणार आहे, म्हणूनच हे आहे, योग सर्वांसाठी!