Skip to product information
-
Media gallery Media gallery
1
/
of
1
Vitamins (व्हिटॅमिन्स) by Achyut Godbole/Dr Vaidehi Limaye
Description
Description
‘व्हिटॅमिन्स’ हे पुस्तक संशोधनावर आधारित, अत्यंत अभ्यासपूर्ण व विषयाची सर्वांग ओळख करून देणारे आहे.कोणत्याही विषयाला मुळापासून भिडून सर्वसाधारण अनभिज्ञ वाचकांसाठी ते सहज सोपे करून मांडणे हे अच्युत गोडबोले व डॉ. वैदेही लिमये यांचे वैशिष्ट्य आहे. प्रत्येक हिटॅमिनच्या संशोधनाचा इतिहासः तसेच त्याची आजच्या युगातील उपयुक्तता व त्या संबंधित विवेचन वैद्यकीय व्यावसायिकांसही वाचनीय आहे.प्रवाही व रसाळ भाषेमुळे हे पुस्तक सामान्य वाचकाला खिळवून ठेवते. या पुस्तकासाठी अनेक शुभेच्छा!– डॉ. अविनाश सुपे‘व्हिटॅमिन्स’सारखा अवघड पण तितकाच गंभीर आणि महत्त्वाचा विषय हाताळणं हे सोपं काम नव्हे. व्यासंगी लेखक अच्युत गोडबोले व डॉ. वैदेही लिमये या दोघांनीही एखाद्या कसलेल्या गायकाच्या कंठातून सहज सुरेल तान निघावी तसा हा विषय शास्त्रीय अभ्यासपूर्ण तरीही रंजक रीतीने मांडला आहे. व्हिटॅमिन्सच्या शोधांच्या कथा, त्यांच्या शोधात आलेले अडथळे, संशोधकांच्या हालअपेष्टा आणि त्यातून त्यांनी मिळवलेते यश यांचा वाचनीय आलेख या लेखकद्वयींनी मांडला आहे.-डॉ. विजय आजगावकरसुप्रसिद्ध मधुमेहतज्ञ आणि लेखकसंशोधनात वापरण्यात येणाऱ्या सर्व शास्त्रीय पद्धतींचा या पुस्तकात मागोवा घेण्यात आला आहे. पाश्चिमात्य व भारतीय परंपरा यांचे दाखले दिल्यामुळे हे लिखाण आकर्षक झाले आहे. पोषण, आहार व निकृष्ट शरीर यांचा संबंधही प्रस्तुत पुस्तकातील विविध प्रयोगांमुळे सिद्ध झालेला दिसून येतो. आहारातील प्रत्येक व्हिटॅमिन्सचे कोणते पदार्थ किती प्रमाणात घ्यावेत, न घेतल्यास होणारे दुष्परिणाम याची सविस्तर माहिती या पुस्तकाद्वारे मिळते. हे पुस्तक मराठीत असल्यामुळे सर्वांना विशेषतः महिलांना, शालेय विद्यार्थ्यांना अत्यंत उपयुक्त ठरेल, यात शंका नाही. ‘व्हिटॅमिन्स’ हे पुस्तक अनेक तरुण (भावी) संशोधकांना प्रेरणादायी ठरेल, अशी सदिच्छा करून पुनश्च लेखकांचे मनःपूर्वक अभिनंदन.– डॉ. व्ही. सुधा रावट्रस्टी, भारतीय महिला वैज्ञानिक संस्था, वाशी, नवी मुंबईव माजी वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी, बी.ए.आर सी. मुंबई.
- Regular price
- Rs. 315.00
- Regular price
-
Rs. 350.00 - Sale price
- Rs. 315.00
- Unit price
- / per
-10%
Couldn't load pickup availability

Notified by email when this product becomes available

Vitamins (व्हिटॅमिन्स) by Achyut Godbole/Dr Vaidehi Limaye