‘तेथे जीवाणू जगती’ ह्या विज्ञान कथासंग्रहानंतर प्रा. म. वि. दिवेकर यांचा हा दुसरा विज्ञानकथासंग्रह आहे. प्रस्तुत पुस्तकातील कथांचा आशय वैज्ञानिक असला तरी त्या सर्जनशील कथा आहेत. प्रा. दिवेकर यांच्या कल्पनाशक्तीला निरीक्षणाची, अनुभवाची व मानवी मनाच्या अभ्यासाची जोड आहे. कल्पित वास्तवावर आधारलेल्या ह्या कथासंग्रहामुळे मराठी विज्ञानसाहित्यात एक नवी भर पडत आहे. ‘विश्वामित्राची प्रतिसृष्टी’ ह्या कथासंग्रहामुळे वाचकांची विज्ञानाभिरुची वाढण्यास मदत होईल यात शंका नाही.