भारतीय तत्त्वज्ञानानुसार सृष्टी निर्माणकर्ता ब्रह्मा, पालनकर्ता विष्णू आणि संहारकर्ता शिव अशी परमेश्वराची रूपे मानली जातात. या तीनही संकल्पना अतिशय सोप्या भाषेत समजावून सांगणारी ही दोन पुस्तके आहेत. विष्णूच्या कपाळावर उभे गंध तर शिवाच्या भाळावर आडवे गंध असे का, हिंदुधर्मात पुनर्जन्म का मनाला जातो, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे या पुस्तकांमध्ये मिळतात. सत्य युगातला परशुराम, त्रेतायुगातला राम, द्वापर युगातला कृष्ण आणि कली युगातला कल्की--- सृष्टीचा पालनकर्ता विष्णू याचे वेगवेगळ्या युगांमधले हे अवतार आणि त्यांमागची संकल्पना समजून घेण्यासाठी वाचावे असे पुस्तक म्हणजे ‘विष्णूची सात रहस्ये’.