बदलत्या भारताची वेगाने वाढणारी ऊर्जेची गरज अणुशक्तीच पुरी करू शकेल, असा दृढ विश्वास असणारा हा शास्त्रज्ञ. डॉ.काकोडकर हे भारताच्या अणु-कार्यक्रमाचे आघाडीचे शिलेदार. पोखरणची लष्करी अणुचाचणी असो वा नागरी वापरासाठीची विद्युत्निर्मिती, देशाच्या अणुकार्यक्रमात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. अणुविज्ञान क्षेत्रातील उच्चपदी ते केवळ योगायोगाने पोचलेले नाहीत. गेली पाच दशके अहर्निश झपाटून काम करणाऱ्या या शास्त्रज्ञाचे आवर्जून वाचलेच पाहिजे, असे चरित्र.