निसर्गाचा शोध घेताना अनेक विस्मयकारी गोष्टी उजेडात आल्या आहेत. तरीही आधुनिक मानवाचे समाधान झालेले नाही. निसर्गातील अशा अनेक अज्ञात गोष्टींचा शोध घेण्याचे काम वैज्ञानिक करीत असतात. प्रस्तुत पुस्तकातील लेख वेगवेगळ्या विषयावरील असले तरी, प्रत्येक लेखातील आशय नवा शास्त्रीय दृष्टिकोन सांगणारा आहे. विज्ञानातील ही भटकंती वाचकांची विज्ञानदृष्टी अधिक समृद्ध करील यात शंका नाही. ज्येष्ठ संशोधक व विज्ञान-लेखक डॉ. रतिकांत हेंद्रे यांच्या ह्या नव्या पुस्तकाचे स्वागत मराठी वाचक मन:पूर्वक करतील यात शंका नाही.