माणसाचे कुतूहल आणि जिज्ञासा ही अनेक शोधांची जननी ठरलेली आहे. या कुतूहलातूनच शास्त्रज्ञांनी मानवजातीला कल्याणकारी ठरणारे अनेक शोध लावले आहेत. अशा वैज्ञानिक प्रश्नांसंबंधी मुलांच्या मनात जिज्ञासा निर्माण होते. असे वैज्ञानिक प्रश्न आणि त्यांची उत्तरे प्रा. शंभुनाथ कहाळेकरांनी या पुस्तकात सोप्या पद्धतीने दिली आहेत. पुस्तकाच्या वाचनाने मुलांत वैज्ञानिक दृष्टिकोन वाढण्यास मदत होईलच; पण त्याबरोबर या विषयाची गोडीही वाढू शकेल. विज्ञानासंबंधीचे हे एकशे एक प्रश्न आणि त्यांची उत्तरेही त्यामुळेच महत्त्वाची आहेत.