डॉ. नीलम गोर्हे यांचा खरा पिंड चळवळीचा, आंदोलकाचा. यासाठी असणारी तळमळ त्यांच्याकडे आहेच; पण अभ्यासू वृत्ती व क्षेत्रीय कार्य करण्याची क्षमताही आहे. राजकीय भूमिका बाजूला ठेवून एक सामाजिक जबाबदारी म्हणून त्या सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांकडे पाहत आल्या आहेत. प्रस्तुत पुस्तकात डॉ. नीलम गोऱ्हे यांनी गेल्या पाच वर्षात विधानपरिषदेत केलेल्या कामकाजाचा एका अर्थाने ताळेबंदच मांडला आहे. शिवसेनेच्या विधानपरिषद सदस्य म्हणून आ. डॉ. नीलम गोर्हे यांनी सामाजिक प्रश्न, शेतकर्यांची व इतर आंदोलने, रोजगार हमी योजना, महिला अत्याचार,भाविकांचे प्रश्न, हिंदुत्त्वाचे प्रश्न, विविध विधेयके अशा शेकडो विषयांना उपस्थित करून विधानपरिषदेचे व एकूणच सरकारचे लक्ष वेधून घेतले. एक जबाबदार पतिनिधी म्हणून त्या किती ‘जागृत’ होत्या, हे या पुस्तकाच्या प्रत्येक पानावर स्पष्ट होते. त्यांच्या ह्या कार्याची माहिती सर्वांनाच व्हावी यासाठी हा ग्रंथप्रपंच.