१९९२ पासून गतिमान झालेला असला तरी राज्यातील प्राथमिक सक्तीचे आणि मोफत व्हावे असा आग्रह महाराष्ट्रातील अनेक थोर सामाजिक आणि राजकीय नेत्यांनी गेल्या सुमारे शंभर वर्षापूर्वी होता, शिक्षणातील सुप्त सामर्थ्य या सर्व नेत्यांनी जाणले होते. शिक्षण ह सामाजिक व आर्थिक विकासाचा एक अनिवार्य घटक आहे याची जाणीव या सर्वांना प्रकपन झाली होती. 'लोकशाहीची पाळेमुळे लोकांत असतात आणि ती दृढ करण्यासाठी सार्वत्रिक प्राथमिक शिक्षणाची आवश्यकता असते' है या नेत्यांनी ओळखले होते आणि त्यासाठी त्यांनी प्रयत्न केले होते. महाराष्ट्र राज्य शासनाने प्राथमिक शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणासाठी जे विविध कार्यक्रम अलीकडच्या काळात हाती घेतले आहेत ते शिक्षणातील सर्व कार्यकर्त्यांना आणि सर्व समाजाला ज्ञात होणे महत्वाचे आहे. त्या दृष्टीने प्राथमिक शिक्षणाच्या कृतिकार्यक्रमाची माहिती आणि तदनुषंगाने प्राथमिक शिक्षणाचा विचार या पुस्तकातून करण्यात आला आहे.