पर्यावरण हा विषय एकविसाव्या शतकात फार महत्त्वाचा ठरणार आहे. मानव शेती करू लागला, तेव्हापासून पर्यावरणावर परिणाम करणारा सर्वांत महत्त्वाचा घटक असं स्वरूप त्याला हळू हळू प्राप्त होऊ लागलं. शेतीसाठी जंगलतोड, पाण्यासाठी बांध, असं करत माणूस बरीच वर्षं जगला. औद्यागिक क्रांतीनंतर मानवाची निसर्गातली ढवळाढवळ वाढीस लागली. विसाव्या शतकात तिनं फारच गंभीर स्वरूप धारण केलं. दुसया महायुद्धानंतर पर्यावरणाचं महत्त्व हळूहळू आपल्या लक्षात येऊ लागलं. १९६५ नंतर पर्यावरण संरक्षणाला महत्त्व प्राप्त झालं. पर्यावरणप्रदुषण ह्या महत्त्वाच्या ग्रंथानंतर निरंजन घाटे ह्यांच्या लेखणीतून पर्यावरणाची सांगोपांग माहिती देणारा हा महत्त्वाचा ग्रंथ उतरला आहे. पर्यावरणाच्या चाहत्यांना तो खूप उपयोगी पडेल.