'प्राचीन काळात व्यापारी उद्देशाने सौदागरांचे तांडे देशीविदेशीचा भूगोल पालथा घालत. या तांड्यांबरोबर नट, नर्तक, वैदू, हेर, चोर असे घटकही सोबत जात. क्वचित परक्या भूगोलावर गुन्हेगारी धुडगूस घालत. आजचे भूराजकारण असेच काहीसे आहे. पृथ्वीवरील खनिजसंपत्ती आणि ती वाहून नेण्याचे व्यापारी मार्ग हे फक्त युरोप-अमेरिकेच्या ताब्यात हवेत, ही आजची अटीतटी मोठी आहे. त्यासाठी पाश्चात्त्य सांस्कृतिक संस्था, गुप्तचर यंत्रणा आणि शस्त्रलॉबी हातात हात घालून काम करतात. व्यापारी मार्गांवरील देशांना मांडलिक बनवण्याच्या नादात युद्धाचे वणवे पेटवून देतात. मध्यपूर्वेतील अशा युद्धकहाराची ही गोष्ट! '