आजच्या बेरोजगारीच्या काळात कोणताही व्यवसाय हाताशी नसताना आणि थोड्या शेतीवर भागत नसताना वराहपालन हा एक उत्तम जोडधंदा होऊ शकतो.वराहपालन हा व्यवसाय शेतकऱ्यांसाठी वरदान आहे. दुग्ध व्यवसाय, शेळीपालन आणि कुक्कुटपालनापेक्षाही हा व्यवसाय जास्त फायदेशीर ठरू शकणारा आहे. गरज आहे वराहाकडे बघण्याची दृष्टी बदलण्याची!या व्यवसायाची शास्त्रीयदृष्ट्या इत्थंभूत माहिती या पुस्तकातून डॉ. विलास गाजरे यांनी दिली आहे. साध्या सोप्या भाषेतील हे पुस्तक शेतकरी, उत्साही युवावर्ग आणि सुशिक्षित बेरोजगारांना निश्चितच मार्गदर्शक ठरणारे आहे.