१९०५ ... हे वर्ष बंगालच्या फाळणीचे. त्याचप्रमाणे वन्दे मातरम् या शब्दांच्या मंत्रत्वप्राप्तीचे. या फाळणीमुळे भारतीयांमध्ये एकजुटीची भावना निर्माण झाली. एकीचे बळ शत्रूला नमविते याची जाणीव झाली. आणि मग... एक चॆतन्यमय लहर निर्माण झाली. यात प्रमुख वाटा लाल-बाल-पाल या त्रयींचा होता. सावरकर, चिदंबर पिल्ले व अरविंदांचाही होता. सशस्त्र क्रांतिवीरांचा आणि सामान्य जनांचाही होता. यात फूट पाडण्यासाठी... ‘मुस्लीम लीग’ चा जन्म झाला. लीगने जातीय विष पेरले व दंगे केले. तरीही... बंगाल्यांनी एकत्रित संघर्ष केला. फाळणी मोडीत निघाली. पुढे १९४७ मध्ये तशीच नव्हे, त्याहून भयंकर फाळणी अस्तित्वात आली. देशाचे आणखी तुकडे पडू द्यायचे नसतील तर शंभर वर्षापूर्वीचा हा संघर्ष अभ्यासायला हवा. ...यासाठीच ही रोचक इतिहास कहाणी. मराठीमध्ये प्रथमच!