वनस्पतीतील विज्ञान. या पुस्तकात डॉ. रतिकांत हेंद्रे ह्यांनी आपल्या दैनंदिन जीवनाशी, धार्मिक विधींशी आणि सांस्कृतिक जीवनाशी निगडित
अशा वनस्पतींची संशोधकाच्या दृष्टिकोनातून ओळख करून दिलेली आहे. ह्या सर्व लेखांना शास्त्रीय अधिष्ठान आहे; तशीच वैज्ञानिक शिस्त पण आहे. त्यामुळे हे सर्व लेख अभ्यासपूर्ण झाले आहेत. डॉ. रतिकांत हेंद्रे हे पुण्यातील राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेत संशोधक म्हणून चौतीस वर्षे कार्यरत होते. टीश्यू कल्चरमधील त्यांच्या संशोधनासाठी त्यांना राष्ट्रीय पातळीवरील ‘सी. एस. आय. आर. टेक्नॉलॉजी पुरस्कार’ प्राप्त झालेला आहे. त्यांचे अनेक शोधनिबंध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय शास्त्रीय नियतकालिकांमध्ये प्रसिद्ध झाले आहेत.