स्त्री, पुरुष व त्यांची संतती हे कुटुंबाचे मुख्य घटक. पहिल्या दोन घटकांमधील म्हणजे विवाहित स्त्री पुरुषांमधील संबंधांचा साकल्याने विचार करताना लैंगिक जीवनासंबंधी लिहिणे अपरिहार्य असते. या पुस्तकात ज्या मुलांमुलींचे मूलपण संपून प्रौढत्वास सुरुवात झाली आहे, त्यांच्या हाती देण्यास कोणत्याही प्रकारची हरकत नाही. या पुस्तकात विवाहसंस्था, स्त्रीपुरुष संबंध, साथीदाराची निवड कशी करावी, संततीविषयक प्रश्नांविषयी, विवाहाचे विकृतीशास्त्र, वैवाहिक जीवनात उत्पन्न होणार्या प्रश्नांचे व त्यांवर सल्ला त्यांची माहिती दिली आहे.