{"product_id":"vaintey-by-v-s-khandekar","title":"Vaintey by V. S. Khandekar","description":"\u003cdiv class=\"tabbable bookdetailtabber\"\u003e\n\u003cdiv class=\"tab-content\"\u003e\n\u003cdiv class=\"tab-pane active\" id=\"pane2\"\u003e‘प्रज्ञा आणि प्रतिभा’ (भाग-२) हा वि.स.खांडेकरांचा प्रातिनिधिक समीक्षात्मक लेखांचा संग्रह आहे. यात एकूण एकवीस समीक्षात्मक लेख आहेत. ‘सरस्वती मंदिरातील दिवाणी दावा’ या लेखातून खांडेकर मराठी भाषेची बिनतोड वकिली करतात, तर अव्वल इंग्रजी कालखंडानंतर मराठी भाषा व साहित्यास स्वबळ व स्वचेहरा प्राप्त कसा झाला, ते ‘लघुकथा’ आणि ‘मराठी लघुकथा’ या दोन लेखांतून स्पष्ट करतात. तसेच त्यांच्या स्वत:च्या ‘ययाति’, ‘उल्का’, ‘कांचनमृग’ या कादंबऱ्यांवरही त्यांनी लेख लिहिले आहेत. साहित्य संमेलनांवरही त्यांनी भाष्य केलं आहे. तर हे सगळेच लेख खांडेकरांची काव्य-शास्त्र-विनोदाची जाण, त्यांची अभ्यासू, स्वागतशील वृत्ती, मराठीविषयीचं प्रेम, त्यांचा दांडगा व्यासंग इ. गुणांचं दर्शन घडवणारे आहेत आणि पुढील पिढीसाठी मार्गदर्शक आहेत. ते अवश्य वाचले पाहिजेत.\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003csection class=\"reviews-section\"\u003e\u003c\/section\u003e","brand":"Rasik Sahitya","offers":[{"title":"Default Title","offer_id":53653264040254,"sku":null,"price":270.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"url":"https:\/\/rasiksahitya.com\/products\/vaintey-by-v-s-khandekar","provider":"Rasik Sahitya LLP","version":"1.0","type":"link"}