‘उत्सव सुरूच आहे’ हा कवितासंग्रह म्हणजे इमरोज आणि अमृता
यांच्या सहजीवनाचा काव्यात्म शोध आहे. अमृताच्या जाण्यामुळे अस्वस्थ झालेले इमरोज अमृताच्या आणि स्वत:च्याही व्यक्तितत्वाचा आणि त्यांच्यामध्ये निर्माण झालेल्या नात्याचा शोध घेत आहेत. आणि त्याहीपेक्षा अधिक महत्त्वाचे म्हणजे स्त्री-पुरुष संबंधासह एकूण मानवी जीवनाचाही ते शोध घेत आहेत. श्री. किशोर मेढे यांनी ह्या कवितांचा अनुवाद करून मराठी वाचकांसाठी उपलब्ध करून दिल्या आहेत. मूळ कवीच्या अनुभवाशी अधिकाधिक प्रामाणिक राहण्यात श्री. मेढे यांना यश प्राप्त झाले आहे. श्री. किशोर मेढे हे स्वत:च कवी असल्यामुळे त्यांना हे शक्य झाले आहे.