चांगलं तेच ग्राहकांना देईन एवढा एकच हेतू मनात असला की देव आणि दैव मदतीला येतं. आत्मविश्वास असला की तेथे धाडस जन्म घेतं हे श्री. विजय काळे यांच्या 'उटणे, पोळ्या आणि मी' या व्यावसायिक आत्मनिवेदनातून प्रत्ययाला येतं. उद्या व्यवसायात येऊ इच्छिणाऱ्या प्रत्येक तरुणाला मार्गदर्शक ठरावं असं हे लेखन आहे. कितीही गरिबीची परिस्थिती असली तरी माणूस आत्मविश्वास, अथक परिश्रम आणि प्रामाणिकपणा या जोरावर वाटचाल किती प्रकाशमय करू शकतो याचं बोलकं उदाहरण म्हणजे हे पुस्तक. मुख्य म्हणजे माणूस या कल्पनेवरची श्रद्धा अधिक दृढ होते. अशा वाटेवर चांगली माणसेच आपल्याला भेटायला परमेश्वर धाडतो.