‘कोणी, कोणी मारलं तुला? काय दिसतंय तुला सांग... नीट बघ तुझ्या पूर्वजन्मात...’ ‘आईगंऽऽ! माझ्या पोटात, माझ्या नाजूक कमरेला कोयत्याचा विळखा पडलाय... त्याचं धारदार टोक माझ्या पोटात रुततंय... वेदना... कळा... आईगं... रक्ताची चिळकांडी... धार...’ ‘कोणी मारलं तुला सांग... सांगशागीर्द...’ ‘मीविंâ काळी फोडली... राजाऽऽ’ ‘राजानं मारलं?’ ‘नाही. त्यानं धरलं मला. तो घाबरलाय. त्याच्या चेहऱ्यावरच्या वेदना... तोरडतोय... मी माझे शेवटचे क्षण... समोर तो उभा आहे. मी त्याच्याकडे बघत्येय. एकटक. रोखून...’ ‘कोण आहे? आत्ता ह्या जन्मातही आहे तो?’ ‘हो’ ‘तू ओळखतोस?’ ‘हो’ ‘सांगशागीर्द...’ ‘त्याचा पांढरा टिळा.. रक्तानं माखला आहे. तो ते रक्त पुसतोय. त्या टिळ्याखाली एक काळा-पांढरा डाग दिसतोय... तो कृष्णा आहे.’ ‘शक्य नाही. कृष्णाचं तुझ्यावर... म्हणजे इंदूवर प्रेम आहे. तो तसं नाही...’ ‘त्यानंच... त्यानंच. तोे या जन्मातही आहे...’ ‘नाही. शक्य नाही. तो या जन्मात कसा असणार...?’ ‘आहे. त्याच्या कपाळा वरचा तो काळा डाग याही जन्मात तिच्या कपाळावर आहे...’ ‘पुरे. शागीर्द. जागाहो... जागाहो... जागा...’