Skip to product information
-
Media gallery Media gallery
1
/
of
1
Urle Keval Gane by Vijay Shingornikar
Description
Description
प्रेमात पडलेले नायक आणि नायिका अचानक तालासूरात गाणं म्हणू लागतात. विरहानं किंवा प्रेमभंगानं व्याकूळ झालेला नायक भर रस्त्यात अचानक आपल्या दु:खाला वाचा फोडतो. नायक अथवा नायिका अडाणी असो की सुशिक्षित, त्यांच्या गाण्यातले शब्द मात्र लाजवाब असतात आणि ते तालासूरांचेही पक्के असतात. कुणी काहीही म्हणो, भारतीय चित्रपटांचं हे वैशिष्ट्यच त्याला हॉलीवूडवर मात करण्याचं बळ गेली पाऊणशेहून अधिक वर्षे देत आलं आहे. गाण्याची, वाद्यवृंदाची शैली ऐकली की त्याचा संगीतकार जसा चटकन ओळखता येतो तसा त्या गाण्याचा काळही साधारणत: कळतो. भारतीय चित्रपट त्याच्या दिग्दर्शकाच्या नावाने क्वचित ओळखले जातात, कलावंतांच्या नावाने हमखास ओळखले जातात आणि त्यातील गाण्यांमुळे मात्र निश्चितपणे ओळखले जातात. चित्रपटांचा दर्जा आणि गाण्यांची गुणवत्ता यांत सहसा काही संबंध नसतो, त्यामुळेच सुमार दर्जाच्या चित्रपटांत उत्तम गाण वाया गेल्याची अनेक उदाहरणे आपल्याकडे सापडतात. कालांतराने काही चित्रपट डब्यात जातात, काही विस्मृतीत जातात तर काहींची नावे आठवणेसुद्धा कठीण होऊन बसते, अनेकदा त्यातली गाणी मात्र ओठांवर आणि हृदयात कायम राहतात. गाणीच हिंदी चित्रपटांचा खरा इतिहास सांगतात. हा भूतकाळ काहीजण नुसताच चिवडत बसतात तर काही चवीनं चिवडतात आणि त्यात हाताला लागलेलं अद्भूत असं काहीतरी ओघवत्या शैलीत इतरांपर्यंत पोचवतात. विजय शिंगोर्णीकरांनी गेली काही वर्षे हे काम सातत्यानं केलं
आहे. स्मृतिधूसर झालेल्या चित्रपटांना इतिहासाच्या अडगळीत ढकलून, कालावर मात करीत रेंगाळलेल्या गाण्यांच्या स्मृतिमधूर आठवणीवर बेतलेलं हे पुस्तक त्या हिंदोळ्यावर बसवून वाचकांना झुलवतं आणि खुलवतं. - श्रीकांत बोजेवार
- Regular price
- Rs. 207.00
- Regular price
-
Rs. 230.00 - Sale price
- Rs. 207.00
- Unit price
- / per
-10%
Couldn't load pickup availability

Notified by email when this product becomes available

Urle Keval Gane by Vijay Shingornikar