उर्दू शायरीचा नजराणा या उर्दू शायरीच्या संकलनाच्या वेळी मी शक्य तितकी विविध प्रकारची शायरी निवडली. हे वाङ्मय सामान्यतः प्रणयविषयक आहे. त्यामुळे इश्क (शृंगार) या विषयावरील शायरी पासून सुरुवात करून रुबाया, गझल या इतर प्रकारांचीही ओळख करून देण्याचा स्वल्प प्रयत्न केला आहे. संकीर्ण या शेवटच्या भागात सर्वच विषयांची सरमिसळ असली, तरी प्रामुख्याने जीवनाविषयीचे विविध शायरांचे विचार आणि भावना व्यक्त करणारे शेर आहेत.मराठी भाषिकांच्या उर्दू-शायरी- आकर्षणाला माझा हा प्रयत्न पुरेसा संतोष देईल, असा विश्वास वाटतो.