पार्वतीबाईंच्या कवितांचा आशय शेती आणि ग्रामीण जीवनाशी संबंधित आहे .
य कवितेत ग्राम आणि कृषीसंस्कृतीचे दर्शन, निसर्ग आणि शेतीची संपन्नता, कौटुंबिक नातेसंबंध , माहेरवाशीण, सासुरवाशीण स्त्रीचे अंतरंग व दुःख, लोकसंस्कृती, सण, समारंभ, व्यक्तिचित्रे इत्यादी विषय आले आहेत. या अनुभवांना वैविध्य आहे, तसेच प्रतिभेचा स्पर्शही आहे.
नव्वदनंतरचे ग्रामीण जीवन भकास आणि उदास झाले आहे. त्यामुळे आजची ग्रामीण कविता हताश उद्गार काढते आणि पर्याय देण्याबाबत गोंधळते. याचा अनपेक्षित आणि नकळत ताण वाचकापर्यंत पोचतो
मात्र या ताणापलीकडचे आणि नव्वदच्या अलीकडचे समृद्ध ग्रामीण जीवन या वृद्ध आणि निरक्षर
कवयित्रीने दर्शवले आहे.
रम्य ग्रामीण भूतकाळ काव्यात्म पातळीवर अनुभवास दिल्याबद्दल आपण पार्वतीबाईंचे कौतुक केले पाहिजे.
प्रा . देवानंद सोनटक्के