तृणधान्य हा आहारातील एक अतिशय पौष्टिक घटक आहे. ज्वारी, बाजरी, मका, नाचणी, ओटस्, तांदूळ, बार्ली, गहू इ. तृणधान्यांपासून होऊ शकणारे विविध पदार्थ यात दिले आहेत.अल्पोपहार, गोड पदार्थ, फराळाचे पदार्थ, उसळी, भाकरी-दशमी, साठवणीचे पदार्थ, उपवासाचे पदार्थ असे वैविध्य राखत सुरुवातीला तृणधान्यांविषयी उपवुक्त अशी माहितीही पाककलानिपुण अग्रगण्य लेखिका मंगला बर्वे यांनी तपशिलवार दिली आहे.