उद्योजकतेचा विकास साधणे हा एक जागतिक प्राधान्यक्रमाचा विषय आहे. नावीन्य, कार्यक्षमता, उच्च कोटीचं कर्तृत्व हे आज यशस्वी उद्योजकासाठी परवलीचे शब्द ठरले आहेत. काहीतरी उद्योग करणं वेगळं आणि तो धडाडीने व कार्यकुशलतेने करणं वेगळं. यासाठी तुमच्यातील प्रेरणा महत्त्वाच्या ठरतात. हे पुस्तक तुम्हाला प्रेरणांचा स्रोत दाखवतं, तुमच्यातील प्रेरणांना जागं करतं आणि त्यांना दिशा दर्शवतं. उद्योगात किंवा व्यवसायात उच्च कार्यक्षमता कशी आणावी, त्यासाठी लागणारी कौशल्यं कोणती, धडाडीच्या वृत्तीचं महत्त्व किती हे सर्व या पुस्तकात अतिशय समर्पकपणे सांगितलं आहे. पुस्तकाचे लेखक सुब्रोतो बागची यांनी MindTree ही त्यांची कंपनी वयाच्या ४२व्या वर्षी सुरू केली. शून्यापासून सुरू केलेली ही कंपनी सहा वर्षांत त्यांनी उच्च स्थानावर पोचवली, ती धडाडी व कार्यक्षमता यांच्या बळावर! त्या अनुभवांतून साकार झालेलं बागची यांचं हे पुस्तक लहान व्यावसायिकांपासून मोठया उद्योजकांपर्यंत सर्वांनाच मार्गदर्शक ठरतं!