भालचंद्र नेमाडे यांचे ‘तुकाराम’ हे मूळ इंग्रजी पुस्तक साहित्य अकादमीच्या ‘भारतीय साहित्याचे निर्माते’ ह्या मालेसाठी लिहिलेले होते. प्रस्तुत पुस्तक हा त्या इंग्रजी पुस्तकाचा मराठी अनुवाद आहे. ‘तुकाराम’ हे पुस्तक नेमाडे यांच्या साध्या, सरळ, अर्थवाही व निस्संदिग्ध भाषाशैलीमळे नेमाडे यांना अगदी सुरुवातीपासूनच असलेल्या खास मराठी परंपरेच्या तीव्र भानामुळे, बारीकसारीक महत्त्वपूर्ण नेमक्या तपशिलाच्या मांडणीमळे. बौद्धिक शिस्तीमळे. निश्चित वैचारिक भूमिकेमुळे, आधुनिकतेची परंपरेशी योग्य व संतुलित सांगड घालण्याच्या त्यांच्या अस्सलतेमुळे व तुकारामावरील अस्सल आणि अकृत्रिम प्रेमामुळे महत्त्वाचे झालेले आहे