ही कादंबरी दीडेकशे वर्षांपूर्वी अमेरिकेत प्रसिद्ध झाली. मिसिसिपी नदीकाठच्या सेंट पीटर्सबर्ग या काल्पनिक गावात राहाणाऱ्या टॉम सॉयर या खोडकर मुलाचं भावविश्व या कादंबरीत उभं राहातं.. बालपणीचा निरागसपणा आणि प्रौढ वयातलं वास्तव यांच्यातील तफावत टॉम सॉयरच्या या गोष्टीतून जाणवते. ही तफावत आपणही अनुभवलेली असतेच ना, त्यामुळं भूगोलाचं नि भाषेचं अंतर पार करून ही कादंबरी आपल्याशी संवाद साधते.