ऊसतोडीच्या हंगामाला जायच्या तयारीत असतानाच शिवाचा सर्पदंशाने मृत्यू होतो. त्याची बायको भिकू सासऱ्याबरोबर (दगडू) आपली तान्ही मुलगी बारकी हिच्यासह ऊसतोड हंगामाला खुर्डावाडीला जाते. बारकीच्या पायगुणामुळे आपला मुलगा गेला असं वाटून तिचे सासू-सासरे बारकीचा रागराग करत असतात. खुर्डावाडीला गेल्यावरही दगडू बारकीचा दुस्वास करतच राहतो. तो बारकीवर राग काढण्यासाठी टोकाचं पाऊल उचलेल या भीतीने भिकू भूमीताईंकडे काही वेळेला बारकीला सांभाळायला देते. ऊसतोड मजुरांना भाड्याने जागा देणाऱ्या, एकाकी असलेल्या भूमीताईंना बारकी ऊर्फ गौरीचा लळा लागतो. हंगाम संपल्यानंतर दगडूच्या गौरीला बरोबर न नेण्याच्या दुराग्रहामुळे भिकू नाईलाजाने गौरीला भूमीताईंकडेच ठेवते. भिकूने मागितल्यावर भूमीताईंनी गौरीला परत द्यायचं, असा लेखी करार झालेला असतो; पण प्रत्यक्षात जेव्हा गौरीला परत द्यायची वेळ येते तेव्हा काय होतं? ऊसतोड कामगारांच्या जीवनाच्या पार्श्वभूमीवर रंगलेलं एक उत्कट भावनाट्य.