फॅन्टॅस्टिक फेलूदा रहस्यकथां’ची मालिका सर्व वयोगटाच्या वाचकांमध्ये लोकप्रिय झाल्याने ‘रोहन प्रकाशन’ पुन्हा एकदा घेऊन आलं आहे – याच फॅन्टॅस्टिक फेलूदाच्या आणखी १२ थरारक कथांचे ४ संग्रह; त्यातल्या या २ कथा…१. एकदा बाजारात फेलूदाची भेट जुन्या वस्तूंचे संग्राहक पार्वतीचरण यांच्या नातवाशी होते. फेलूदाचा चाहता असल्याने तो त्याला अचानक पिंजर्यातून गायब झालेल्या त्याच्या पोपटाचा शोध घेण्याची विनंती करतो. म्हणून फेलूदा त्याच्या घरी जातो. तेव्हाच पार्वतीचरण यांचा खून होतो, आणि मौल्यवान असलेलं ‘नेपोलियनचं पत्र’ही गायब होतं. फेलूदाला पोपटाच्या पिंजर्यावर रक्ताचे डागही सापडतात…!२. जगप्रसिध्द चित्रकार टिंटोरेट्टोचं एक चित्र चित्रकार चंद्रशेखर यांना भेट मिळालेलं असतं. त्या चित्राची किंमत काही लाखांमध्ये असते. वारसा हक्काने त्या चित्राचे हक्क चंद्रशेखर यांच्या मुलाकडे असल्याने चित्र पाहण्यासाठी तो चुलतभावाकडे – नवकुमार यांच्याकडे येतो. तेव्हाच घरातल्या एका म्हातार्या कुत्रीचा ‘खून’ होतो. तपासात फेलूदाला कळतं की, ते चित्र बनावट आहे! खर्या चित्राचा शोध घेत फेलूदा पोहोचतो थेट हाँगकाँगला …’टिंटोरेट्टोच्या येशू’च्या शोधात!