तीन तरुणी भागीदारीत लंडनमधल्या एका सदनिकेत भाड्यानं राहत असतात. पहिली आहे कार्यतत्पर अशी व्यक्तिगत साहाय्यक. दुसरी कलावंत आहे. तिसरी- हर्क्युल पायरो न्याहारी घेत असताना अनाहूतपणे त्याच्या घरी जाऊन त्याला भेटते आणि सांगते की, तिनं खून केलेला आहे. इतकंच सांगून ती शिताफीनं बेपत्ता होते.
हळूहळू या तिसर्या गूढ तरुणीबद्दल, तिच्या कुटुंबाबद्दल आणि तिच्या बेपत्ता होण्याबद्दलच्या पसरलेल्या अफवा पायरोला समजतात. या महान डिटेक्टिव्हला ही तरुणी खरोखरच अपराधी आहे, निर्दोष आहे की वेडी आहे, हे ठरविण्यासाठी ठोस पुरावे मिळवणं आवश्यक असतं.
‘ख्रिस्तीची ही प्रथम दर्जाची रहस्यकथा आहे.’