बलराम हलवाई, - ’द व्हाईट टायगर’ भारताच्या अंधेरनगरीतील एका खेड्यात, एका सायकल रिक्षा चालवणार्याच्या पोटी जन्म घेतलेला बलराम. कहाणीचा नायक! नोकर, तत्त्वज्ञ, उद्योजक आणि खुनीही. सात रात्रींच्या कालावधीत बलराम त्याची जीवनकहाणी सांगतोय... ही भारताच्या दोन रूपांची कहाणी आहे. एक अंधारातला भारत आणि दुसरा प्रकाशातला! अंधेरनगरीतून प्रकाशाकडे जाताना, एका ड्रायव्हरपासून एक अत्यंत यशस्वी व कुशल व्यावसायिक बनताना बलरामला कोणत्या संकटांना तोंड द्यावं लागतं, नीती-अनीतिच्या कल्पना कशा बाजूला ठेवाव्या लागतात आणि तरीही शेवटपर्यंत त्याचं कनवाळू हृदय आणि संवेदनशील मन कसं जागृत राहतं याची ही हृदयंगम कहाणी वाचकाला शेवटपर्यंत खिळवून ठेवेल यात शंकाच नाही.