हर्क्युल पायरोमध्ये आणि हर्क्युलस या प्राचीन ग्रीक नायकामध्ये दिसायला तसं काहीच साम्य नव्हतं. पण हर्क्युलस प्रमाणेच हर्क्युल पायरोनंही समाजाला अतिशय दुष्ट राक्षसांपासून मुक्त केलं होतं.
म्हणूनच निवृत्तीकडे सरकत जाणार्या त्याच्या कारकिर्दीच्या काळात त्याने फक्त बारा खटले घ्यायचं ठरवलं : हीच त्याने स्वत:वर लादलेली मेहनतीची कामं. यातील प्रत्येक खटला म्हणजे गुन्ह्यांच्या इतिहासामध्ये सुवर्णाक्षरांनी नाव नोंदवणारी शोधमोहीमच.
‘छोट्या छोट्या बारा शोधांचा वेध घेणार्या सर्वोत्तम कथा. पायरो आणि अगाथा ख्रिस्ती दोघंही अशा सर्वोच्च बिंदूवर जेथे त्यांचे अनुकरण करणे कोणालाही शक्य नाही.’
- सण्डे एक्सप्रेस