पायरोच्या बेडरूमच्या दरवाज्याच्या चौकटीत एक बिनबुलाया मेहमान उभा होता... आपादमस्तक धुळीने भरलेला. त्या माणसाच्या थकलेल्या चेहर्यानं एक क्षणभरासाठी द़ृष्टीकटाक्ष टाकला. त्यानंतर झोकांडी जाऊन तो पडला. कोण होता तो? त्याला कुठला धक्का बसला होता का? की हा फक्त थकवा होता? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कागदाच्या एका तुकड्यावर वारंवार घोटलेल्या ‘ 4 ’ या आकड्याचं नेमकं महत्त्व काय होतं? पायरो स्वत:ला आंतरराष्ट्रीय कटकारस्थानाच्या जाळ्यात झोकून देऊन ‘ 4 ’ आकड्याचं महत्त्व शोधून काढण्यासाठी स्वत:चा जीव धोक्यात घालतो.
‘रहस्य कथांची सर्वमान्य सम्राज्ञीच!’
- ऑब्झर्व्हर