Skip to product information
-
Media gallery Media gallery
1
/
of
1
Thalwa by Manohar Patil
Description
Description
ठलवा म्हणजे भूमिहीन शेतमजूर. एकीकडे दारिद्य्र आणि दुसरीकडे स्वातंत्र्यानंतरही अस्पृश्यतेच्या फासात अडकलेल्या बळीराम आणि सुभद्राची ही कहाणी. इथं आहे भूक, विवंचना; उपासमार हा जगण्याचा संघर्ष आणि सामाजिक रूढी-परंपरांची अभेद्य चौकट.निसर्गाची अवकृपा आणि शेतमालकांच्या लहरीपणावर ठलवा शेतमजुरांचं जगणं म्हणजे आग्यामोहळाच्या संगतीनं राहणं. उच्चवर्णीयांची तटबंदी तर काय वंचिताच्या शोषणासाठी टपलेली. महार वेटाळातील माणसांचं जगणं बळीरामची होरपळ बनते. जातिव्यवस्थेची उतरंड सोलून काढते. दैन्य, गरिबी, असहायता या संकटांचा संघर्ष शेवटी दीड वितेच्या पोटाची खळगी भरण्यासाठीच्या केविलवाण्या तडजोडीनं घेरला जातो.जगण्याची ही फरपट मेल्यानंतर संपेल, ही भावना बळीरामच्या मनाला घेरते. हा प्रश्न एकट्या बळीरामचा उरत नाही. एकीकडे अस्पृश्य भूमिहीन ठलव्यांचा भाकरीसाठीचा आक्रोश आणि दुसरीकडे देशभर सर्व क्षेत्रात पसरलेला अत्याचाराचा हैदोस यामुळे जगणंच मरणासन्न झाल्याची भावना निर्माण होत आहे. शोषण आणि दमनाची कडी अधिक मजबूत होत आहे.या गोष्टींना काही अंत आहे की नाही?बळीरामचा हा जगण्याचा संघर्ष म्हणजे जगातील सर्वच ठलव्यांचं दु:ख आहे. आपल्या समर्थ भाषासामर्थ्यानं हे समकालीन वास्तव थेटपणे विविध प्रसंगांतून, बोलीभाषेतून वास्तवदर्शी शैलीत लेखकाने मांडल्याने ते वाचकांना अस्वस्थ करणारे आहे.
- Regular price
- Rs. 293.00
- Regular price
-
Rs. 325.00 - Sale price
- Rs. 293.00
- Unit price
- / per
-10%
Couldn't load pickup availability

Notified by email when this product becomes available

Thalwa by Manohar Patil