गेली अनेक दशकं तेलाच्या विहिरींतून आणि तेलवाहिन्यांतून बरंच ‘काळं सोनं' वाहून गेलं. पण गेल्या दीड-दोन दशकांत घडलेल्या उलथापालथींमुळे तेल एका नव्या वळणावर स्थिरावलं. तापलेल्या वसुंधरेची चिंता वाहणाऱ्या पर्यावरणजाणिवांनी तेलाच्या उपयुक्ततेलाच आव्हान दिलं. इतकी शतकं तेलावर पोसल्या गेलेल्या, औद्योगिक प्रगतीची फळं चाखणाऱ्या, निसर्गावर मात करू पाहणाऱ्या या माणूस नावाच्या प्राण्याच्या यापुढच्या जगण्याचा आधार वसुंधरेच्या गर्भातून निघणारं हे खनिज तेल असेल का? तेलाच्या रक्तरंजित इतिहासानंतर तितक्याच रक्तरंजित वर्तमानाचा वेध.