ज्येष्ठ हिंदी साहित्यिक फणीश्वरनाथ रेणु यांचे 2021 हे जन्मशताब्दी वर्ष. त्यांच्या गाजलेल्या निवडक अशा आठ कथा आणि त्याविषयीच्या टिपणांचा हा संग्रह. लेखक-अनुवादक मधुकर धर्मापुरीकर यांनी सिद्ध केलेला.
फणीश्वरनाथ रेणु यांच्या साहित्याबद्दल हिंदीतल्या मान्यवर समीक्षकांचे हे काही अभिप्राय रेणु यांच्या लेखन वैशिष्ट्यांचे यथार्थ वर्णन करतात : मुन्शी प्रेमचंद यांच्या परंपरेचे उत्तराधिकारी म्हणून रेणु यांचे नाव घेतले जाते. त्यांच्या गोष्टीवेल्हाळ शैलीमध्ये मातीचा गंध आणि लोकसंगीताचा प्रत्यय देणारी जुगलबंदी असते, जी वाचकांच्या मनावर एक अमीट अशी छाप सोडते.- ऋत्विक राय
रेणु यांची एका शब्दात ओळख सांगायची झाल्यास असे म्हणता येईल की, ते हिंदी साहित्याचे ‘मृदंगी’ आहेत- लोकसंगीतात रमलेले मृदंगी. त्यांनी साहित्याच्या माध्यमातून संगीत प्रतिध्वनित केले.- अवधेश प्रधान