प्रत्येक गोष्ट शास्त्रीयदृष्ट्या समजून घेणारे पालक वयात येणं का समजून घेऊ शकत नाहीत? कारण ‘वयात येणं’ या घटनेमागे फक्त शारीरिक बदल नाहीत, सामाजिक, सांस्कृतिक, मानसिक, शारीरिक, जीवशास्त्रीय असे सगळेच संदर्भ टीनएजला आहेत. उत्क्रांतीपासून सामाजिकतेपर्यंत सगळीकडेच टीनएजर्सची पाळंमुळं घट्ट रुजलेली आहेत. एरवी पालकांसाठी ‘प्रवेश निषिद्ध’ असणाऱ्या किशोरवयीन मुलांच्या अद्भुतरम्य जगाची सफर या पुस्तकाने घडवून आणली आहे. एखादं न सुटणारं अवघड कोडं सोडवताना जसा आनंद मिळतो, तसाच आनंद निसर्गाने घातलेलं कोडं सोडविण्यात आहे. ‘टीनएजर्स’चं तर्कापलीकडचं गणित उकलताना जगण्याच्या प्रत्येक पायरीवर आपण अधिकाधिक समृद्ध होत जातो.