ती दोघं!वेगवेगळ्या स्वभावांची… वेगवेगळ्या काळातील…नातं एकच – पती-पत्नी, नर-मादी, प्रियकर-प्रेयसीचं !पण भावबंध अनेकविध !कधी यौवनाचं, सौंदर्याचं आकर्षणकधी तिचं विशाल आईपणकधी त्याच्या मनाचं मोठेपणकधी त्याचं फक्त व्यवहारी मनकधी दोघाचं एकमेकांत विरघळून जाणंकधी एकमेकांना पुरतं ओळखून असणंकधी त्रिकोण प्रेमाचा, कधी खेळ दुर्दैवाचाकधी न संपणारं रितेपण, तर कधी जगावेगळं समर्पणकधी प्रेमाला झालर मनमोकळेपणाचीकधी किनार काळी, संशयाची, प्रतारणेचीकधी ती दोघं फक्त समांतर रेषा,कधी शब्दावरण फक्त डोळ्यांचीच भाषाकधी ओढ फक्त शरीराची – भोगवादीकधी ती दोघं फक्त नर आणि मादी…क्वचित इतर कोणतंही नातं इतकं विविधरंगी असेल…हे नातं व्यक्त करणारी भाषा काळानुरूप, संदर्भ आणि प्रसंग त्या त्यावेगळ्या सामाजिक संकेतानुसार!पण ‘भावना’ त्याच… आदिम!एकविसाव्या शतकात वावरणार्या तरुण-तरुणींसाठी नात्यांचे अर्थच धूसर झाले आहेत.भारतीय परंपरांचे, संस्कृतीचे काठ लेवून वाहणारा हा कथांचा ओघ कदाचित हे नातं समजून घेण्यासाठी मन सुस्नात करील…