“जुलमी सत्तेला नकार देणे, तिच्या दृष्टीने गुन्हे ठरणाऱ्या कृतीक्रांतीचा कार्यक्रम म्हणून करीत राहणे, प्रस्थापित सत्ता मोडून तिच्याजागी पर्यायी सत्ता उभी करणे, एकजुटीचे आधार जुळविणे,प्रतीकात्मक स्वरूपात उठावाचे संदेश वेळोवेळी प्रसृत करणे आणिविशिष्ट स्थलकालाच्या अवकाशात सुसंघटित प्रतिकारलढाचालविणे, ही जी कनिष्ठ जनसमूहांच्या (सबाल्टर्न) लढ्याची सहावैशिष्ट्ये रणजित गुहांनी सांगितली आहेत, ती सगळीच तंट्याच्याउठावात आपल्याला पहायला मिळतात.तरीही आजपर्यंत कोणत्याही सबाल्टर्न इतिहासकाराला तंट्याभिल्लाचे गूढ उकलावेसे वाटले नाही, त्याचे कारण स्पष्टच आहे –प्रारंभी शेतकरी, आदिवासी, डावे गट अशा समाजघटकांच्याआंदोलनांच्या अभ्यासावर रास्तपणे आधुनिकोत्तरवादाच्या आहारीगेले आणि सबाल्टर्न शब्दाचाच निरर्थक कीस काढत बसले. सबाल्टर्नदृष्टीच्या अभ्यासकांना जे साधले नाही ते मराठीच्या एका सिद्धहस्तकादंबरीकाराने शक्य करून दाखवले आहे, हे नक्कीच कौतुकास्पदआहे.एका अलक्षित जनआंदोलनाच्या जननायकाच्या अंगाने घेतलेलाशोध कादंबरी लेखनाकडे गांभीर्यपूर्वक पाहणाऱ्या तरुण मराठीलेखकांसाठी वस्तुपाठ ठरावा इतका महत्त्वाचा आहे.”– भास्कर लक्ष्मण भोळे