हिरव्यागार निसर्गाच्या कुशीत अघनाशिनी नदीच्या तीरावर वसलेलं आदोळशी गाव. पूर्वापारच्या रूढी-परंपरा जपणारे देवभोळे लोक अन् जातींच्या जाळयात, धर्माच्या चौकटीत बांधलेलं त्यांचं संथ सरळसोट जिणं. सातासमुद्रापल्याडहून आलेले पोर्तुगीज आणि त्यांचा ख्रिस्ती धर्म चक्रीवादळासारखे आदोळशीवर आदळले. धर्मांतराची जबरदस्ती, धार्मिक अत्याचारातून उलथीपालथी झालेली सामाजिक घडी, देव अन् धर्म डोक्यावर घेऊन, जिवावर उदार होऊन अनेकांनी केलेली पलायनं आणि या सा-यांमुळे देशोधडीला लागलेली आयुष्यं. पाच शतकांपूर्वी गोव्याच्या भूमीवर उफाळलेल्या धार्मिक ज्वालामुखीचा एका प्रतिभावान कादंबरीकारानं घेतलेला वेध