हे पुस्तक निरोगी प्रवृत्ती रुजवणारं आणि सकारात्मक विचारांना प्रवृत्त करणारं आहे. दैनंदिन जीवनातील ताण-तणाव आणि मानसिक अस्वस्थता दूर करून पुन्हा एकदा जीवनाकडे झेप घेण्यासाठी हे पुस्तक उपयुक्त मार्गदर्शन करतं. तणावयुक्त प्रसंगांमुळे तुमच्या जीवनातला आनंद हरपू नये यासाठी पुस्तकात काही साधे सोपे असे उपाय सांगितले आहेत.डॉ. ख्रिश्चन श्रायनर हे एक मानसोपचारतज्ज्ञ आहेत. ते तणावमुक्तीचं मार्गदर्शन करतात. अस्वस्थपणा, ताण आणि विफलता हे छुपे शत्रू बर्याचवेळेस सकारात्मक ध्येय गाठण्यासाठी अडचणीचे ठरतात. त्यामुळे अनेक समस्या निर्माण होतात. अशा ताण-तणावातून मुक्त होण्यासाठी अनेक वर्षांच्या अनुभवावर आधारलेली अत्यंत प्रभावशाली आणि यशस्वी तसंच सहजगत्या आचरणात आणता येईल अशी पध्दत या पुस्तकात लेखकाने सोप्या आणि सुटसुटीत पध्दतीने समजावून सांगितली आहे.मानसशास्त्राचं ज्ञान तसेच मानसोपचाराचा अनुभव आणि सामान्यज्ञानाची असामान्य जाण या गोष्टींची अंतर्दृष्टी प्राप्त झालेले डॉ. श्रायनर यांनी हळुवारपणे केलेलं हे सुस्पष्ट मागदर्शन म्हणजे दैनंदिन जीवनातील ताण दूर करणार्या उपायांचा खजिनाच… अर्थात् आनंद घेण्याचा मार्ग!