माणसांच्या करणीच्या प्रवाहाच्या मुळाशीच हात घातला आणि महापुरातही ती करणी घट्ट पकडली तर तुमच्या हाती यशाचा खजिना लागू शकतो.
गॉर्डन क्लोडचं दुर्दैव! लंडनवर झालेल्या बॉम्बहल्ल्यात बिचारा मारला गेला. त्याची सर्व धनदौलत त्याच्या तरुण पत्नीला मिळाली. त्याची पत्नी म्हणजे पूर्वाश्रमीची मिसेस अंडरहे.
गॉर्डनबरोबरचं तिचं हे दुसरं लग्न. गॉर्डनचे रक्ताचे नातेवाईक अर्थातच नाराज होते. पण जणू काही दैवी शक्तींनी त्यांच्या शंका-कुशंका आणि नाराजीचे भाव हर्क्युल पायरोपर्यंत गूढ मार्गानं पोचवले. विधवा रोझालीन मोठी धनसंपत्ती आणि नवर्याचे गरजू नातेवाईक यांच्या कचाट्यात सापडलेली आहे. काहीही करून पायरोला रोझालीनचा जीव वाचवायचा आहे.
‘अत्यंत सुपीक कल्पनाशक्ती, प्रफुल्ल भाषाशैली आणि वेगवान कथनपद्धती ही या कादंबरीची वैशिष्ट्ये आहेत.’
मँचेस्टर इव्हिनिंग न्यूज