ॲस्ट्रोपायलट दिक्पाल आर्य .….. धाडसी, हरहुन्नरी, हजरजबाबी, प्रसंगावधानी अशा दिक्पालची मंगळावर जाण्यासाठी निवड झाली . पृथ्वीवरील मानवांचा प्रतिनिधी म्हणून मंगळावर जाण्याचा प्रथम मान मिळणं, ही भूषणावह गोष्ट होती . दिक्पाल मंगळावर उतरला …यानातून बाहेर पडून चालत जाताना त्याच्या सहकाऱ्यांना तो दिसलाही … पण तेवीस दिवसांनी परत येणं अपेक्षित असणारा दिक्पाल तब्बल २५ ९ दिवसांनी परतला. एवढे दिवस कुठे होता तो? विश्वातल्या अज्ञात, अकल्पित आणि अनपेक्षित घडामोडींची आणि मानवाच्या राक्षसी महत्वाकांक्षेची थरारक कथा.. स्वप्नमोहिनी!
विख्यात भयकथा, गूढकथा आणि विज्ञानकथा लेखक नारायण धारप यांची सर्वच वयाच्या वाचकवर्गाला गुंगवून टाकणारी कादंबरी