४० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या मंगला राजवाडे या शिवणकलेत जशा पारंगत आहेत, याचप्रमाणे शिवणकाम शिकविण्याची कलाही त्यांना चांगली अवगत आहे. म्हणूनच त्यांचे हे पुस्तक शिवणकला शिकणार्यांसाठी वैशिष्टयपूर्ण ठरणार आहे. या पुस्तकात त्यांनी स्त्रिया, पुरुष व लहान मुलं यांच्या कपडयांचे अनेकविध प्रकार दिले आहेत. सर्व माहिती सविस्तरपणे, आकृत्यांसह व सोप्या पद्धतीने सांगितली आहे. त्याबरोबर मापेही काटेकोरपणे दिलेली आहेत. शिवणकला अवगत असणे केव्हाही चांगले. त्यासाठी हे पुस्तक आपणास उत्कृष्टरीत्या मार्गदर्शन करेल एवढे निश्चित!