Skip to product information
1 of 1

Sun Mere Bandhu Re By Satya Sen, Milind Champanerkar

Description

हिंदी चित्रपटसंगीताच्या सुवर्णयुगातील अग्रणी संगीतकार सचिन देव बर्मन यांना चित्रपटमाध्यमाची चांगली जाण होती;गानदृश्य व्हिज्युअलाइज करण्याची आणि प्रसंगानुरूप गाणी स्वरबद्ध करण्याची क्षमता त्यांच्यात होती.त्यांच्या अशा वैशिष्ट्यांमुळेच ते इतर समकालीन संगीतकारांपेक्षा खचितच अधिक चतुरस्र व सदाबहार संगीतकार ठरू शकले.अशा त्यांच्या अनेक वैशिष्ट्यांचा शोधक नजरेने मागोवा घेणा‌र्‍या सत्या सरन लिखित मूळ इंग्रजी पुस्तकाचा मिलिंद चंपानेरकर यांनीकेलेला हा अनुवाद– `सुन मेरे बंधु रे'.`ये रात ये चाँदनी तू कहाँ', `जलते है जिसके लिए', `गाता रहे मेरा दिल' ते `कोरा कागज था ये मन मेरा' यांसारखीअसंख्य आनंददायी प्रणयगीतं... `वक्त ने किया क्या हंसी सितम', `जाये तो जाये कहाँ' यांसारखी अविस्मरणीय विरहगीतं...`ये दुनिया अगर मिल भी जाये तो क्या है' सारखी सामाजिक रोष व्यक्त करणारी गीतं ते `वहाँ कौन है तेरा', `सुन मेरे बंधु रे' सारखी त्यांनी स्वत: गायलेली या मातीतली व तत्त्वज्ञानात्म डूब असलेली गाणी...त्यांच्या संगीतातील वैविध्याची साक्ष देणारी अगणित गीतं आहेत, परंतु अशा त्यांच्या गीतांची निर्मितीप्रक्रिया उलगडून दर्शवणारं आणि त्यामागच्या प्रेरणास्रोतांचा कल्पकतेने वेध घेणारं हे एकमेवच पुस्तक ठरावं.एस.डी.बर्मन यांच्या संगीताचा व त्यांच्या बालपणापासूनच्या व्यक्तिजीवनातील प्रेरणास्रोतांचा अन्वय लावणारं, त्यांची स्वभाववैशिष्ट्यं सांगणारं मराठी संगीत-रसिकांसाठी एक संग्राह्य असं पुस्तक        `सुन मेरे बंधु रे...'
Regular price
Rs. 300.00
Regular price
Sale price
Rs. 300.00
-0%
Condition: New
Language: Marathi
Publicaion: Rohan Prakashan
Sun Mere Bandhu Re by Satya Sen, Milind Champanerkar
Sun Mere Bandhu Re By Satya Sen, Milind Champanerkar

Recently viewed product

You may also like