सूफी हा एक उदारमतवादी संप्रदाय आहे. धर्म आणि आचाराच्या क्षेत्रात सूफीचे स्थान विशिष्ट आहे. देश, वर्ग आणि कोणत्याही विशिष्ट धर्मापलिकडे त्याचे अस्तित्व आहे.
आंतरिक भावनेला महत्त्व देणारा सूफी संप्रदाय इ. स. ६५०पासून विकसित होत गेला. मुस्लीम राजवटीच्या पूर्वीच भारतात सूफीचे आगमन झाले.
प्रस्तुत ग्रंथात डॉ. मुहम्मद आज़म यांनी सूफी तत्त्वज्ञानाची सखोल चर्चा केली आहे. सूफीची लक्षणे, गुणवैशिष्ट्ये, सूफीमत आणि भारतीय तत्त्वज्ञान, सूफी तत्त्वज्ञानाचा ग्रांथिक व वाङ्मयीन आविष्कार अशा अनेक विषयांवर डॉ. आज़म यांनी येथे केलेली चर्चा अभ्यासपूर्ण आहे. सूफी तत्त्वज्ञान हे सिद्धांत आणि साधना यात कसे विभागले गेले आहे, याची सविस्तर मांडणी येथे लेखकाने केली आहे.
केवळ सूफीच्या अभ्यासकांनाच नव्हे, तर सूफी संप्रदायाविषयी ज्यांना उत्सुकता व कुतूहल आहे, ह्या सर्वांना हा ग्रंथ मार्गदर्शक ठरेल, यात शंका नाही.