सदर पुस्तकामध्ये अनेक व्यवसायांतील व विविध क्षेत्रांतील ज्यांच्या यशोगाथा सर्वांना ज्ञात आहेत, अशा महान आणि दिग्गज व्यक्तींच्या यशाचे रहस्य शोधण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.विजयी माणूस कसा घडतो? हा प्रश्न ज्या महान माणसाने प्रथम विचारला, तो म्हणजे नेपोलियन हिल. हा जगातल्या दिग्विजयी माणसांच्या यादीत खूप वरच्या क्रमांकावर विराजमान झाला आहे. यशस्वितेचे प्रसिद्ध मंत्र सांगणाऱ्या या शिक्षकाने स्वत:चे नशीब आणि आयुष्यातल्या अपार कष्टांचा फार मोठा भाग ‘यशस्वितेच्या नियमांचे’ तत्त्वज्ञान तयार करण्यासाठी खर्च केला. हे सगळं साध्य करण्यासाठी त्याने जगातील यशस्वी माणसांच्या गळ्यात विजयाची माळ घालणाऱ्या त्यांच्या विशिष्ट श्रद्धा व त्यांचे कर्तृत्व यांचा शोध घेतला.नेपोलियन हिल यांनी यशस्वितेच्या एवं गुणविशिष्ट अशा १७ तत्त्वांचा शोध लावून, त्या तत्त्वांविषयी सखोल आणि तपशीलवार लिखाण केले. यशस्वितेचं चैतन्यमयी प्रकाश देणारं हे लिखाण त्यांनी नंतर संक्षिप्त स्वरूपात आणलं; जेणेकरून ज्यांना जागृत होऊन विजयी व्हायचंच आहे त्यांना ते सहज हाताला लागेल. त्याचा परिणाम म्हणजे यशस्वितेकडे नेणारी जादूई शिडी.