ऐकोणिसाव्या शतकाचा उत्तरार्ध आणि विसाव्या शतकाचा पूर्वार्ध असा जवळजवळ एक शतकाचा कालखंड हा स्त्रीसुधारणा आणि स्त्रीसंघटन या दोन्ही दृष्टींनी फार महत्वाचा आहे. अखिल भारतीय स्तरावर स्त्रियांनी एकत्र येउन स्थानापन्न केलेली अखिल भारतीय महिला परिषद म्हणजे या काळातल्या स्त्रीविकासाच्या वाटचालीतला महत्वाचा टप्पा.