"स्त्रीमनाचा एका वेगळ्या रीतीनं ठाव घेणारं हे ललित लेखन. भवताली दिसलेल्या स्त्रियांच्या मनामध्ये डोकावून त्यातला एक सबळ धागा शब्दरूप करणं हा लेखनाचा हेतू. ते स्त्रीमन चित्रित करताना वीणा देव ह्यांनी मोजक्या शब्दात एकेका मनरूपाची मांडणी मोठ्या कौशल्यानं केली आहे. वाचताना वाचकाच्या मनात ते रूप साकारावं आणि त्याबरोबरच स्त्रीमनाच्या अनेक धाग्यांच्या जाणिवा जाग्या व्हाव्यात अशा ताकदीचं हे लेखन झालं आहे. विविध स्त्री - मनरंगांचा हा गोफ वाचणं हा एक समृद्ध करणारा अनुभव आहे.'